Thursday, December 22, 2011

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Sunday, December 4, 2011

साफ दिलाचा मित्र हरपला शिवसेनाप्रमुखांची श्रद्धांजली.....



साफ दिलाचा मित्र हरपला
शिवसेनाप्रमुखांची श्रद्धांजली...........

शिवसेनाप्रमुख म्हणाले,
देव आनंद म्हणजे एकदम साफ दिलाचा माणूस. हा आमचा मित्र एकाएकी जाईल असे वाटले नव्हते. त्याच्या जाण्याने मनस्वी दु:ख होत आहे, अशा शब्दांत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी देव आनंद यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शिवसेनाप्रमुख पुढे म्हणाले, देव आनंद गेल्याचे सकाळीच समजले. अशावेळी काय बोलावे! माझे व देव आनंदचे संबंध फार जुने म्हणजे 1945 पासूनचे. त्याची संपूर्ण कारकीर्द, म्हणजे त्याच्या कारकीर्दीचा उगवता सूर्यच मी पाहिलाय. गिरगावात तेव्हा सेंट्रल सिनेमा होता. आजही तो असावा. तेव्हा मी फेमस स्टुडिओमध्ये होतो. प्रभात चित्रकंपनी फुटल्यानंतर बाबूराव पै यांनी ‘फेमस’ची स्थापना केली. त्यात मी प्रेस लेआऊट आर्टिस्ट म्हणून नोकरीला होतो. फेमस स्टुडिओ महालक्ष्मीला होता. देव आनंद तेथे भेटायचा. त्याच्या चित्रपटाचे काम झाल्यावर आम्ही अनेकदा चालत चर्नीरोड स्टेशनवर जायचो. देव आनंद फर्स्टक्लासच्या डब्यात चढायचा आणि आम्ही पास असल्यामुळे थर्ड क्लासमध्ये चढायचो. अशा तर्‍हेने तो त्याच्या मार्गाने आणि आम्ही आमच्या मार्गाने जात असू. हे संबंध शेवटपर्यंत टिकून राहिले. नंतर त्याचे ‘मातोश्री’वरही येणे-जाणे होत असे. त्याचे एखादे पुस्तक प्रसिद्ध झाले की ते देण्यासाठी तर हमखास स्वत: येत असे. अनेकदा पार्ट्यांतही भेटायचा. जेवणंही व्हायची. त्याचे वागणे, बोलणे सगळे झपाझप असे. भरभर चालायचा आणि भरभर बोलायचा. त्यात स्वल्पविराम, पूर्णविराम नसायचा. माणूस एकदम दिलाचा साफ. असा आमचा मित्र एकाएकी जाईल असे वाटले नव्हते. तो सगळ्यांचा लाडका लव्हबर्ड होता. चॉकलेट बॉय म्हणूनही प्रख्यात होता. त्याला भेटावे, बोलावे अशी इच्छा होती. पण दूर लंडन येथे जाऊन तो सगळ्यांना सोडून गेला. त्याचे मनस्वी दु:ख होत आहे. मी माझ्यातर्फे, कार्याध्यक्ष उद्धव व असंख्य शिवसैनिकांतर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहे. आमच्या लाडक्या देवाला देव शांती देवो हीच सदिच्छा!

Wednesday, October 5, 2011

विश्‍वविक्रमी दसरा मेळावा



शिवसेनेचा विश्‍वविक्रमी दसरा मेळावा
हिंदुत्वाची तोफ उद्या शिवतीर्थावर धडाडणार


>मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) - गेली ४५ वर्षे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा बनलेला शिवसेनेचा विश्‍वविक्रमी दसरा मेळावा गुरुवारी शिवतीर्थावर दणक्यात साजरा होणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार असून हिंदुत्वाची तोफ यानिमित्ताने पुन्हा एकदा धडाडणार आहे. शिवसेनाप्रमुखांच्या तेजस्वी विचारांचे सोने लुटण्यासाठी उत्साह संचारलेल्या लाखो शिवसैनिकांनी महाराष्ट्र तसेच देशाच्या कानाकोपर्‍यातून मुंबईकडे कूच केले आहे.
एकच नेता, एकच मैदान अशी ख्याती असलेला हा दसरा मेळावा यंदाही त्याच दिमाखात आणि त्याच जल्लोषात होणार आहे. ‘सायलेन्स झोन’चे विघ्न दूर करीत न्यायालयानेही या मेळाव्याला सशर्त परवानगी दिल्याने शिवसैनिकांनी त्याची जोरदार तयारी केली आहे.
कॉंग्रेस आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे, टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात पंतप्रधान मनमोहन सिंग, गृहमंत्री चिदंबरम यांचे अडकलेले हात, तुरुंगात गेलेले मंत्री आणि खासदार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लोकपाल विधेयक आंदोलनाने देशात उठवलेले वादळ, आदर्श घोटाळ्याने महाराष्ट्रात घडवलेला राजकीय भूकंप, महागाईच्या भस्मासुराने गोरगरीबांच्या ताटातील हिरावलेला घास आणि त्याचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी कॉंगे्रस-राष्ट्रवादीचा सुरू असेलला कलगीतुरा, मुंबई, ठाणे, नाशकात होणार्‍या आगामी निवडणुका...या विषयांवर शिवसेनाप्रमुख काय भाष्य करतात... देशाला कोणता विचार देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे हेही यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.


* दिनांक : ६ ऑक्टोबर


* स्थळ : शिवतीर्थ, दादर. * वेळ : सायंकाळी ६ वा.

Sunday, June 12, 2011


पुण्याई अन आशिर्वाद वाड-वडिलांचे..
खंबीर अन कणखर नेतृत्व युवा सेनेचे ....



तेजोवलय घेऊन येत प्रत्येक उद्याचे........



सूर्यासम लखलखती तेज आदित्यचे .........
युवा हृदय सम्राट आदित्यजीना वाढदिवसाच्या दशलक्ष शु भे छ्या......!!!

Sunday, January 30, 2011





सरकार मान्यताप्राप्त हॉस्पिटल मध्ये पुरुष/महिला उमेदवारांची मोट्ट्या प्रमाणात" सुरक्षा रक्षक/Security Guard" पदासाठी शिवसेना भवनात आज ३१/०१/२०११ रोजी ठीक २.३० वाजता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती !!! ४०० उमेदवारांची भर्ती !!! इष्ट मित्र आप्तेष्ट आजू बाजूवाले सर्वाना घेऊन या !!! माझी शिवसेना ! माझी आई !माझ्या आईलाच माझ्या रोजगाराची काळजी !!!

Saturday, January 22, 2011

Wednesday, January 19, 2011