Wednesday, November 11, 2009

शिवसेना गीत

आम्ही शिवाचे सैनिक वेडे, करु जिवाचे रान.....

पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान!

आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान!!

हे भगवे आमुचे रक्त, तळपतो तप्त हिंदवी बाणा.....२

जात, गोत्र अन् धर्म आमुचा शिवसेना! शिवसेना!!

वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास

खड्‍ग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास

लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास!

'महाराष्ट्र धर्म वाढवा' ..... सांगतो शिवबांचा इतिहास!!

बस पुरे आता ना होऊनी देऊ माणुसकीची दैना,

जात, गोत्र अन् धर्म आमुचा शिवसेना! शिवसेना!!

धगधगता अग्नी चहूकडे अन् मार्ग निखाऱ्यांचा

जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा

अरे हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा 'भेकडांचा'

वाघ एकला राजा, बाकी खेळ 'माकडांचा'!!

अरे घडवून दावू आम्ही जे कोणास कधी जमले ना

जात, गोत्र अन् धर्म आमुचा शिवसेना! शिवसेना!!

कायापालट कोकणचा ह्या आम्ही करुनी दावू

मराठवाड्या हिरवा शालू आम्ही नेसवूनी दावू

अरे लचके तोडून पश्चिम घाटा ज्यांनी हो निंदिले

धूळ चारुनी त्यांना पुन्हा सोने पिकवुनी दावू

विदर्भ आमुची शान असे अन् मान असे हो आमुची

कशी छाटुनी देऊ?? आम्ही प्राण पणाला लावू!

जळगाव असे हो आमुचे जितके 'बेळगाव' ही तितके

एकमुखाने महाराष्ट्राचे गीत मराठी गाऊ

अरे आठवा 'बॉम्बे' चे या 'मुंबई' आम्हीच हो केले ना!

जात, गोत्र अन् धर्म आमुचा शिवसेना! शिवसेना!!

Tuesday, November 10, 2009

जय भवानी जय शिवाजी




















इन्द्र जीमी जंभपर, वाढव सुअंभ पर,

रावण सदम्भ पर, रघुकुल राज है |


पौन बारीबाह पर, संतु रतीनाह पर,

ज्यो सहसत्रबाह पर, राम द्वीजराज है |


दावा दृमदंड पर, चीता मृगझुंड पर,

भूषण बितुंड पर, जैसे मृगराज है |


तेज तम अंस पर, कान्हा जीमी कंस पर,

त्यों मलेच्छ वंश पर, शेर शिवराज है |

Tuesday, September 22, 2009


महाराष्ट्राच्या विकासाला गति


शिवसेना-भाजपा युति !!




Saturday, August 1, 2009

ध्येय व धोरणे



ध्येय


१.
आम्ही हिंदुस्थानी आहोत म्हणून हिंदूत्व हा आमच्या पक्षाचा मुख्य पाया आहे.
२.
ह्या राष्ट्राच्या विरोधात असणार्यांशी शिवसेनेची लढाई ही अखंड चालू राहील.
३.
स्वतःच्या हक्कासाठी व राष्ट्राच्या उभारणीसाठी शिवसेना नेहमी प्रोत्साहन देईल.
४.
समाजसेवा व सामाजिक ऐक्य हेच समाज विकासाचे मार्ग आहेत असा शिवसेनेचा ठाम विश्वास आहे म्हणून सक्रीय राजकारणापेक्षा जास्त सामाजिक चळवळीवर शिवसेनेचा अधिक भर आहे.
५.
धर्म, जात व भाषा ह्यामधल्या किरकोळ मतभेदांवर शिवसेनेचा बिलकुल विश्वास नाही. उलट ह्याला कुणीही बलि पडू नये अशीच शिवसेनेची शिकवणूक आहे.
६.
राज्याच्या अधिकृत भाषेमध्ये तरुणांना शिक्षण मिळावयास हवे.


धोरणे


१.
मत्रूभूमिबद्दल व समाजाबद्दल असलेल्या जवाबदार्या व कर्तव्ये ह्याची जाणीव असलेला शक्तिमान ताठ मानेने चालणारा तसेच सुसंस्कृत तरुण उभा करणे.
२.
मत्रूभूमिबद्दल केव्हाही कसलाही त्याग करावयास तयार असलेली एक शक्तिशाली संघटना निर्माण करणे.
३.
राजकारण वा सत्ता नव्हे तर समाजसेवा हेच अंतीम ध्येय आहे अशी भावना समाजात निर्माण करणे.
४.
समाजविघातक, राष्ट्रविघातक शक्तिंविरुद्ध तसेच भ्रष्टाचार, आरोग्य व लालफितीत अडकलेले प्रशासनाच्या विरोधात ठामपणे मुकाबला करण्याची एक जाणीव समाजामध्ये निर्माण करणे.
५.
युवापीढीमधील नैराश्य हटवून त्यांच्या मनामधे असा आत्मविश्वास निर्माण करणे की ते बेकारी, अशिक्षीतपणा व गरीबीविरुद्ध लढा देऊ शकतील. त्यांना शिक्षण व विविध क्षेत्रात प्रशिक्षण देणे.
६.
राष्ट्रीय हितसंबंध जपणे, कायद्याला मान देणे व संपूर्ण राष्ट्रासाठी सक्रीय सामाजिक कायदा असावा ह्याबद्धल आग्रही असणे.
७.
समजामधे बंधूत्व, एकसंघपणा व सुसंवाद प्रस्थापीत करणे.

Friday, July 31, 2009

उद्धव साहेब


पुरोगामी महाराष्ट्र आज गोन्धळलेला आहे। गुदमरलेला आहे। हताश आहे। आजवरच्या इतिहासात महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीही नव्हती। रोजच्या रोज नवीन प्रकार घडत आहेत। काही राजकारणी आंदोलनाच्या चुली पेटवून त्यावर आपल्या स्वार्थाच्या भाकरी भाजत आहेत, तर काहीजण लोकांची दीशाभुल करुन स्वत:चं अपयश लपवत आहेत। मीडीया नावाचा बेभान राक्षस या अराजकामध्ये भर घालण्याचे काम करीत आहे। सामान्य जनता मात्र काहिसी बावरली आहे, काहिसी संतापली आहे, काहिसी हताश झाली आहे।या सर्व पार्श्वभूमीवर अगस्ताळ्या, भोंदू, ढोंगी राजकारण्या ऐवजी.. महाराष्ट्रास गरज आहे उद्धव साहेब यांच्या सारख्या शांत, संयमी, सुसंस्कृत, तरीही दूरदृष्टी असणा-या नेत्याची.. ......

Thursday, July 30, 2009

माननीय बाळासाहेब ठाकरे


हिन्दु ह्रुदय सम्राट, माननीय बाळासाहेब ठाकरे.एक अस व्यक्तिमत्व कि ज्याची ओळख करुन देण्याची गरज नाहि. अख्खे महाराष्ट्र त्यांना साहेब या नावानी ओळखतो.एकटा माणुस, एक ज्वलंत विचार मनाशी, अंगार मुखाशी घेऊन एक संघटन बनवतो "शिवसेना". आज शिवसेनाचा विचार केल्या शिवाय एक हि राजकिय निर्णय घेतला जात नाहि एवढि प्रचंड ताकत.एकट्या माणसाच्या आवाजाने उभा पेटलेला महाराष्ट्र शांत होऊ शकतो तर शांत महाराष्ट्र पेटु शकतो.एक माणुस पुर्ण शिवाजी पार्क-"शिवतिर्थ" खचाखच भरवुच कसे शकतो, तेहि अनेक वर्षे सलग हे अजुन न सुटलेले कोडेच. म्हणुनच बाळासाहेब ठाकरे हे नुसते व्यक्तिमत्व नसुन एक चमत्कार आहेत.अश्या व्यक्तिमत्वास माझे प्रणाम, त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र घडवायचा प्रयत्न करुया.जय महाराष्ट्रजय महाराष्ट्र.....

मी शिवसे॓निक


बाळासाहेव हेच माझी शक्ती,बाळासाहेव हेच माझे स्फ़ुर्ती स्थान.आत्ता पर्यन्त छ्प्पन सेना आल्या आणि गेल्या टिकली ति फक्त "आपली शिवसेना". शिवसेनेच्या जिवावर मोठे झालेले उठले होते शिवसेनेचे जहाज बुडवायला, पण त्याना शिवसेनेने आपली जागा दाखवली आहे. हि शिवसेना आहे आपली आपल्या बाळासाहेबांची.आत्ता पर्यन्त एकहि साधे निर्माण करु न शकलेली मुले आज उठलेत रंगीत झेन्डे घेउन नवनिर्माण करायला. त्यांना हि आपली सुरवात "बाळासाहेब हेच माझे दे॓वत" म्हणुनच करावी लागते, नंतर झेंडे नाचवत येतात आणि काय म्हणतात, आम्हाला मतं द्या. हि आहे आपल्या बाळासाहेंबांची ताकत.हा एकच माणुस जो आपल्या माणसांना, शिवसॆ॓निकाला कधिहि एकटा टाकुन गेलेला नाही, मि तो नव्हेच, मि असे बोललो नाहि, हा चुकिचा अर्थ काढला....छे असले शब्द कधीच नाहि. पाडुन च्या पाडुन जेंव्हा सर्व जण म्हणत होती आम्ही नाही 'ती' पाडली ते तर होते शिवसॆ॓निक. त्या वेळि याच माणसाचे शब्द होते... "जर ती माझ्या शिवसॆ॓निकांनी पाडली असेल तर मला माझ्या शिवसॆ॓निकांचा अभिमान आहे" रिंगणातुन पळुन जाणारा माणुसंच नव्हे हा.या अश्या बुलन्द नेत्याचा मि आहे शिवसे॓निक, होय मी शिवसे॓निक.जय महाराष्ट्र !