Friday, July 31, 2009

उद्धव साहेब


पुरोगामी महाराष्ट्र आज गोन्धळलेला आहे। गुदमरलेला आहे। हताश आहे। आजवरच्या इतिहासात महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीही नव्हती। रोजच्या रोज नवीन प्रकार घडत आहेत। काही राजकारणी आंदोलनाच्या चुली पेटवून त्यावर आपल्या स्वार्थाच्या भाकरी भाजत आहेत, तर काहीजण लोकांची दीशाभुल करुन स्वत:चं अपयश लपवत आहेत। मीडीया नावाचा बेभान राक्षस या अराजकामध्ये भर घालण्याचे काम करीत आहे। सामान्य जनता मात्र काहिसी बावरली आहे, काहिसी संतापली आहे, काहिसी हताश झाली आहे।या सर्व पार्श्वभूमीवर अगस्ताळ्या, भोंदू, ढोंगी राजकारण्या ऐवजी.. महाराष्ट्रास गरज आहे उद्धव साहेब यांच्या सारख्या शांत, संयमी, सुसंस्कृत, तरीही दूरदृष्टी असणा-या नेत्याची.. ......

Thursday, July 30, 2009

माननीय बाळासाहेब ठाकरे


हिन्दु ह्रुदय सम्राट, माननीय बाळासाहेब ठाकरे.एक अस व्यक्तिमत्व कि ज्याची ओळख करुन देण्याची गरज नाहि. अख्खे महाराष्ट्र त्यांना साहेब या नावानी ओळखतो.एकटा माणुस, एक ज्वलंत विचार मनाशी, अंगार मुखाशी घेऊन एक संघटन बनवतो "शिवसेना". आज शिवसेनाचा विचार केल्या शिवाय एक हि राजकिय निर्णय घेतला जात नाहि एवढि प्रचंड ताकत.एकट्या माणसाच्या आवाजाने उभा पेटलेला महाराष्ट्र शांत होऊ शकतो तर शांत महाराष्ट्र पेटु शकतो.एक माणुस पुर्ण शिवाजी पार्क-"शिवतिर्थ" खचाखच भरवुच कसे शकतो, तेहि अनेक वर्षे सलग हे अजुन न सुटलेले कोडेच. म्हणुनच बाळासाहेब ठाकरे हे नुसते व्यक्तिमत्व नसुन एक चमत्कार आहेत.अश्या व्यक्तिमत्वास माझे प्रणाम, त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र घडवायचा प्रयत्न करुया.जय महाराष्ट्रजय महाराष्ट्र.....

मी शिवसे॓निक


बाळासाहेव हेच माझी शक्ती,बाळासाहेव हेच माझे स्फ़ुर्ती स्थान.आत्ता पर्यन्त छ्प्पन सेना आल्या आणि गेल्या टिकली ति फक्त "आपली शिवसेना". शिवसेनेच्या जिवावर मोठे झालेले उठले होते शिवसेनेचे जहाज बुडवायला, पण त्याना शिवसेनेने आपली जागा दाखवली आहे. हि शिवसेना आहे आपली आपल्या बाळासाहेबांची.आत्ता पर्यन्त एकहि साधे निर्माण करु न शकलेली मुले आज उठलेत रंगीत झेन्डे घेउन नवनिर्माण करायला. त्यांना हि आपली सुरवात "बाळासाहेब हेच माझे दे॓वत" म्हणुनच करावी लागते, नंतर झेंडे नाचवत येतात आणि काय म्हणतात, आम्हाला मतं द्या. हि आहे आपल्या बाळासाहेंबांची ताकत.हा एकच माणुस जो आपल्या माणसांना, शिवसॆ॓निकाला कधिहि एकटा टाकुन गेलेला नाही, मि तो नव्हेच, मि असे बोललो नाहि, हा चुकिचा अर्थ काढला....छे असले शब्द कधीच नाहि. पाडुन च्या पाडुन जेंव्हा सर्व जण म्हणत होती आम्ही नाही 'ती' पाडली ते तर होते शिवसॆ॓निक. त्या वेळि याच माणसाचे शब्द होते... "जर ती माझ्या शिवसॆ॓निकांनी पाडली असेल तर मला माझ्या शिवसॆ॓निकांचा अभिमान आहे" रिंगणातुन पळुन जाणारा माणुसंच नव्हे हा.या अश्या बुलन्द नेत्याचा मि आहे शिवसे॓निक, होय मी शिवसे॓निक.जय महाराष्ट्र !